Ad will apear here
Next
‘दीक्षित डाएट प्लॅन’ लावणार राज्याला शिस्त
राज्याच्या स्थूलता नियंत्रण मोहिमेच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी डॉ. जगन्नाथ दीक्षित
मुंबई : दिवसाला किमान ४५ मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम, दिवसातून फक्त दोन वेळा जेवण आणि प्रत्येक जेवणाचा कालावधी जास्तीत जास्त ५५ मिनिटे... वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंधासाठीची ही ‘दीक्षित डाएट प्लॅन’ची प्रमुख सूत्रे गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली आहेत. या लोकमान्यतेनंतर या प्लॅनला आता जणू राजमान्यताच मिळाली आहे. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या या सूत्रांचा ज्यांनी प्रभावी प्रसार केला, त्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची राज्य शासनाने स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नियुक्तीबद्दलचे पत्र १९ नोव्हेंबर २०१८ रोजी डॉ. दीक्षित यांना दिले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थूलता नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. या विषयातील अनुभव आणि ज्ञान यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. डॉ. दीक्षित यांच्या या आहार पद्धतीमुळे देशा-विदेशातील रुग्णांना फायदा झाला आहे. स्थूलतेमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर झाल्यामुळे डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. 

डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी विकसित केलेल्या आहार पद्धतीच्या तत्त्वांवर अधिक संशोधन करून त्यांचा प्रभावी प्रसार करण्यात डॉ. दीक्षित यांची मोलाची भूमिका आहे. यू-ट्यूबवर त्यांची व्याख्याने लाखो जणांनी पाहिली असून, त्यांनी लिहिलेले ‘विनासायास वेटलॉस’ हे पुस्तकही लोकप्रिय ठरले आहे. 

सध्याच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे मधुमेहासह अन्य विकारांनाही निमंत्रण मिळते. पुरेसा व्यायाम आणि ठरलेल्या वेळेत आहार या प्रमुख सूत्रांच्या आधारे स्थूलता आश्चर्यकारकरीत्या कमी करण्यात यश मिळते, असा डॉ. दीक्षित यांचा अनुभव आहे. त्यांची सूत्रे अगदी काटेकोरपणे पाळलेल्या सर्वांनाच हा अनुभव आला आहे. स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केल्यामुळे राज्यातील नागरिकांना ‘विनासायास वेटलॉस’चे महत्त्व प्रभावीपणे समजू शकेल.

(डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विनासायास घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQDBU
Similar Posts
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.
निवडणुकीसाठी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध मुंबई : ‘विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची बुधवारी (९ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल झालेल्या पाच हजार ५४३ उमेदवारांपैकी चार हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
ग्रामविकासासाठी झटणारी संस्था ‘गावे सुखी आणि समृद्ध झाली तरच देश समृद्ध होऊ शकतो’ या भूमिकेशी बांधील राहून, ‘गावाकडे चला’ या महात्मा गांधींच्या संदेशातून प्रेरणा घेऊन १५ ऑगस्ट १९८३ रोजी लातूरमधील अहमदपूरमध्ये ‘ग्रामीण विकास लोकसंस्था’ या संस्थेची स्थापना झाली. राहायला जमीन नसणाऱ्या, गरीब आणि वंचित लोकांसाठी ही संस्था गेली ३४ वर्षे काम करत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language